गोवा लोकसभेचा निकाल जाहीर भाजप एक तर काँग्रेस एका जागेवर विजय

पणजी ता.२३: देशातील पहिला निकाल हा गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात लागला आहे.गोव्यातील लोकसभेच्या दोन जागांपैकी एक जागा भाजपने तर एका जागी काँग्रेसने विजय मिळविला आहे.दक्षिण गोव्यात काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्दीन हे ३ हजार ८४७ मतांनी विजयी झाले आहेत.सार्दीन यांना २५ हजार ३५८ मते तर भाजपचे नरेंद्र सवाईकर याना २१ हजार ५११ मते मिळाली.
उत्तर गोव्यात भाजपचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी १० हजार ६८ मतांनी विजय मिळवला आहे.नाईक यांना २८ हजार ३३३ मते तर पराभूत काँग्रेस उमेदवार गिरीश चोडनकर याना १८ हजार २६५ मते मिळाली आहेत.

Related Articles

Back to top button