
प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे १ नोव्हेंबरपासून धान्य उचल व वितरण बंद आंदोलन.
राज्य फेडरेशन व महासंघातर्फे करण्यात आलेल्या शिखर परिषदेतील ठरावानुसार रेशन दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचा १ नोव्हेंबर रोजी धान्य उचल व वितरण बंद आंदोलन करण्याचा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटना रत्नागिरी या संघटनेने दिला आहे. या संदर्भात नुकतीच चिपळूण येथे संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक झाली. या बैठकीत या अंदोलनाच्या दृष्टीने चर्चा झाली.बैठकीच्या सुरूवातीलाच उद्योगपती स्व. रतन टाटा, स्व. गोपाळ नकाशे तसेच स्व. दीपक पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर राज्य फेडरेशन व महासंघ आयोजित शिखर परिषदेत झालेल्या ठरावानुसार रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटना रत्नागिरी या संघटनेच्या बैठकीत चर्चेअंती १ नोव्हेंबर पासून धान्य उचल व वितरण बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे.www.konkantoday.com