
खेड परिसरात गॅस्ट्रोबरोबच डेंग्यु साथीने डोके वर काढले
भरणे ः दोन महिन्यापूर्वी शहरासह ग्रामीण भागात थैमान घालणार्या डेंग्युची साथ नियंत्रणात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी कुडोशी, सुकिवली, कर्टेल आदी नदीकाठच्या गावात डेंग्युच्या साथीने डोके वर काढले आहे. याशिवाय गॅस्ट्रोचाही फैलाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एप्रिल महिन्यात शहरात डेंग्युच्या साथीने अक्षरशः थैनाम घातले होते. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून शर्थीचे प्रयत्नही करण्यात आले. याशिवाय सलग ३ दिवस डास प्रतिबंधक फवारणीही करण्यात आली.