
रत्नागिरी शहरातील एस.टी बसस्थानक, पिकअप शेड परिसर युवा सेने कडून सॅनिटाईज
युवासेना तालुका युवाधिकारी तुषार साळवी, शहर युवाधिकारी अभिजीत दुडे यांच्या नेतृत्त्वाखाली दसर्याच्या पुर्वसंध्येला रत्नागिरीतील सर्व पिकअपशेड, दोन्ही बसस्थानक परिसर सॅनिटाईज केला
दसरा, दिवाळीच्या निमित्ताने अनेक लोक खरेदीच्या निमित्ताने रत्नागिरी शहरात दाखल होतं आहेत.
युवा सेनेने रत्नागिरी करांच्या आरोग्य हितासाठी साळवी स्टॉप ते रहाटाघर या मार्गावर येणारी सर्वच्या सर्व पिकअपशेड, रहाटघर व मध्यवर्ती एस टी बस स्थानक, नियंत्रण कक्ष, शौचालये, एसटी पास वितरण खिडकी, आरक्षण खिडकी यासह सर्व परिसर सॅनिटाईज केला. गावातील अनेक लोक या ठिकाणी ये-जा करतात. त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. एका दिवसात सर्वच्या सर्व पिकअपशेड स्वच्छ केली. त्यामुळे नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, रत्नागिरी एस.टी आगार व्यवस्थापक अजयकुमार मोरे साहेब, देवदत्त पेंडसे, विकास सनगरे, अजिंक्य सनगरे,रोहित मायनाक, मेहुल जैन, रितेश साळवी, राजेश तुलसंकर, इफराज धर्मे, नूरमोहमद पावसकर, राजस कदम, सन्नन वस्ता, सर्वेश शेलार, युवराज शेटे दर्शन रेडीज ,फरहान मुल्ला ,अथर्व पंगम, लोभस देसाई आदी मान्यवर उपस्थित होते
www.konkantoday.com