
रत्नागिरी येथील नव्याने सुरू झालेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या एका थेंबावरून शरीरातील आजाराचा निष्कर्ष काढणारे मशिन उपलब्ध होणार.
रत्नागिरीयेथील नव्याने सुरू झालेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या एका थेंबावरून शरीरातील आजाराचा निष्कर्ष काढणारे मशिन उपलब्ध होणार आहे.हे ‘हेल्थ एटीएम किऑक्स’ नामक मशिन पाच मिनिटात ५० रुग्णांच्या तपासण्या करण्याची क्षमता ठेवणारे आहे. मुंबईसह कोकणात कुठल्याही रुग्णालयात हे मशिन उपलब्ध नाही. हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात या मशिनद्वारे तपासणी शिबिरे घेतली जाणार असल्याचे हॉस्पिटलचे प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र परदेशी यांनी सांगितले.रत्नागिरीतील मजगांव रोड येथे लो. बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे नुकतेच पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकार्पण केले. ५० खाटा असलेल्या या हॉस्पिटलची सेवा कॅशलेस असून, ते पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आणखी २० दिवस लागणार आहेत. शासनाकडून रुग्णांना कुठल्या योजनेतून उपचार व इतर सेवा द्यायच्या, याचे निर्देश यायचे आहेत. ग्रामीण भागात आर्थिक अडचणींमुळे आजार अंगावर काढले जातात. या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या नवीन आधुनिकमशिनची सेवा ग्रामीण भागातही द्यावी, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्रस्टला केल्या आहेत