दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार न बदलल्यास दापोलीत महायुतीला फटका.
भारतीय जनता पार्टी महायुतीतील सर्वच घटक पक्ष व महायुतीचा सन्मान करत असली तरी लोकसभा निवडणुकीतील साडेआठ हजारांची पिछाडी लक्षात घेतली तर दापोली विधानसभा मतदारसंघातील जागा धोक्यात असल्याचे संकेत देत आहे. त्यामुळे येथील उमेदवार बदलासाठी आम्ही आग्रही आहोत. मात्र तसे न झाल्यास महायुतीला मोठा फटका बसेल, असा इशारा गुरूवारी भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी येथे दिला. भाजपच्यावतीने मंडणगडात खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या आयोजित कार्यक्रमात साठे बोलत होते.मतदार संघात आम्ही लोकहिताची कामे करणार नाही व दुसर्यांनी केली तर आम्ही करून देणार नाही, ही निती सोडण्याची गरज आहे. आमदार योगेश कदम यांनी भारतीय जनता पक्षासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी. आम्ही त्यांचा मनमानी कारभार व चुकांवर खुल्या दिलाने टीका केली. पक्ष व आमच्या नेत्यांचा अवमान पक्षाने स्वाभिमानी कार्यकर्ते कधीही सहन करणार नाहीत, असा इशाराही दिला.www.konkantoday.com