
कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करा, प्रवासी संघटनांची मागणी.
प्रवासी वाहतुकीसह पूरक प्रमातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याचा आग्रह कोकण विकास समितीने धरला आहे. यासाठी राज्यातील २३ प्रवासी संघटनांची समितीही स्थापन करण्यात आली असून याद्वारे प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला जाणार आहे.१९९० मध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची बांधा, वापरा आणि १५ वर्षांनी किंवा सर्व देणी दिल्यानंतर जे आधी होईल तेव्हा कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलिन करा, असे धोरण आखण्यात आले होते. २००८-०९ मध्ये केंद्र सरकारने कोकण रेल्वेची सर्व देणी देवून झाल्यावरही ती स्वतंत्रच राहील असे ठरवल्याने मूळ उद्देशाला एकप्रकारे हरताळ फासल्याचा आरोप संघटनेने केला आहे. महामंडळ केवळ रेल्वे चालवण्याअखेरीस इतर पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी लक्षणीय कामगिरी करू शकत नाही. www.konkantoday.com