कोकणात राणेंच्या रुपाने सुरू असलेली घराणेशाही मतदारांनी हाणून पडण्याची गरज- माजी आमदार परशुराम उपरकर.

निलेश राणेंच्या विधानसभेच्या तिकिटासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून नारायण राणे वणवण करीत आहेत.कोकणात राणेंच्या रुपाने सुरू असलेली घराणेशाही मतदारांनी हाणून पडण्याची गरज आहे .आता राणेंची मुले आली ,पुढे नातू येतील.त्यामुळे बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या निलेश राणेंना सच्चे शिवसैनिक स्वीकारणार का? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.कणकवली येथील संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये बापानंतर मुलगा किंवा मुलगी आमदार,खासदार अशी परिस्थिती दिसून येते. राणे स्वतः भाजपमध्ये असताना त्यांचा मुलगा काँग्रेस मध्ये होता.त्याचा प्रवेश भाजपात करण्यासाठी त्यावेळी त्यांनी धडपड केली.शेवटी कणकवलीच्या एका माजी आमदारांचे हस्ते त्यांचा भाजपात प्रवेश झाला. राणेंचा एक मुलगा हा भाजप मध्ये आहे.आता दुसऱ्या मुलाचे पुनर्वसन व्हावे,यासाठी धडपड सुरू आहे.राणे आपला दुसरा मुलगा आमदार व्हावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत.राणे आपल्या कुटुंबासाठी कितीवेळा विविध पक्षांचे कपडे बदलतील? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी किती राहायचे हे लोकांनी आताठरवले पाहिजे.राणेंची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहेमाजी खा.सुधीर सावंत यांनी ज्यावेळी राणे काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करतील,असे वक्तव्य केले होते.तेव्हा राजापूर न्यायालय परिसरात त्यांच्यावर दगडफेक झाली होती.मात्र, काही दिवसातच राणेंनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.राणेंची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. त्याचा एक संचालक भाजपमध्ये ,एक संचालक शिंदे शिवसेना पक्षात जाणार आहे.आता तुतारी किंवा अन्य पक्षात कोणाला पाठवतात,हे पाहणे महत्वाचे आहे. राणेंचे जुने सहकारी ते ज्या पक्षात जातात तिथे ते जातातआपली पक्ष निष्ठा बाजूला ठेवून ठेका मिळवून काहीजण समाधान मानतात. मात्र, ज्यांना राजकीय अभिलाषा आहे, त्यांना राणेंनी झाकून ठेवले आहे.राणेंनी आपल्या कुटुंबातील दुसरा आमदार करण्याचे ठरवले आहे.त्यामुळे हा प्रयत्न जनतेने हाणून पाडला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button