घरडामध्ये आज मंगळवारी स्टार्टअप आयडीयाथॉन

कोकणातील उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या नवउद्योजकांसाठी लवेल येथील घरडा इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या वतीने आज मंगळवारी जीआयटीमध्ये स्टार्टअप आयडीयाथॉन २०२० चे आयोजन केले आहे.
आरआयटी इस्लामपूर व ओपेक्स स्टार्टअप एक्सलेरेटर यांनी जीआयटी संयुक्तरित्या कोकणातील होतकरू तरूणांना प्रोत्साहनपर स्पर्धा होत आहे. २८ जानेवारीच्या पहिल्या फेरीत स्पर्धक तज्ञांसमोर आपली संकल्पना मांडतील, त्यातील सर्वोत्कृष्ट कल्पनांना पुढील अंतिम फेरीसाठी निवडले जाईल. तसेच २५ मार्चला होणार्या अंतिम फेरीसाठी त्यांना निर्मिती संदर्भात उपयुक्त अशी दोन प्रशिक्षणे दिली जातील. १२ आठवड्याचे उत्कृष्ट मार्गदर्शन व निवडलेल्या अंतिम कल्पनांना १ लाख रुपयापर्यंतचे आर्थिक सहाय्य ही या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button