कुस्तीपटू विनेश फोगाटने हरियाणा विधानसभेत जुलाना मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला
कुस्तीपटू विनेश फोगाटने हरियाणा विधानसभेत जुलाना मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला. भाजप उमेदवार योगेश बैरागी यांचा त्यांनी पराभव केला. सुरुवातीला मतमोजणीत विनेश फोगाट मागे होत्या. नंतरच्या फेऱ्यांमध्ये मात्र त्यांनी आघाडी कायम ठेवली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पॅरिस ऑलम्पिकमध्ये काहीशा जास्त वजनामुळे विनेश फोगाट कुस्तीच्या अंतिम फेरीपुर्वी अपात्र ठरल्या होत्या. सबंध देश सुवर्णपदकाची अपेक्षा करत असताना पदकापासुनच मुकावे लागले होते. विधानसभेच्या राजकीय पटलावर मात्र त्या पात्र ठरल्या आहेत आणि राजकीय वजन देखील या निमित्ताने वाढले आहे.विनेश फोगाटने राजकीय कुस्तीच्या मैदानात लढणे पसंत गेलेहरियाणा विधानसभा निवडणुकीत चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी विनेश हा एक प्रमुख चेहरा होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विनेश फोगाटला काहीशा अतिरिक्त वजनामुळे ऑलिंपिकमधून अपात्र व्हावे लागले, यावर संबंध देशाने दुःख व्यक्त केले होते. त्यानंतर कुस्तीला रामराम ठोकत विनेश फोगाटने राजकीय कुस्तीच्या मैदानात लढणे पसंत गेले. काँग्रेस उमेदवार म्हणून जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली.