रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ उद्योगमंत्री उदय सामंत याच्यावर पुष्पवृष्टी करणार.
रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यात २९ हजार ५५० कोटींचे उद्योग तर ३८००० रोजगार संधी निर्माण केल्या आहेत. रत्नागिरीच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा हा एक बूस्टर डोस ठरू शकतो. यामुळे रत्नागिरीच्या बाजारपेठेतील उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. मंत्री महोदय उदय सामंत यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना धन्यवाद देण्यासाठी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करुन त्यांचा सत्कार केला जाणार आहे. राम आळी ते गोखले नाका या मार्गावर हा कार्यक्रम आज दुपारी १२.३० वाजता होणार आहे