रत्ननगरीत उद्योग क्रांती करण्याऱ्या उद्योगमंत्र्यांवर व्यापाऱ्यांनी केली पुष्पवृष्टी
रत्नागिरी : रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तब्बल २९ हजार ५५० कोटींचे उद्योग आणून रत्ननगरीत उद्योग क्रांती करणाऱ्या उद्योगमंत्र्यांचे आज पुष्पवृष्टी करीत शहरातील बाजारपेठेत स्वागत करण्या आले. मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात व ढोल ताशांच्या गजरात फुलांनी सजवलेल्या गाडीतून उद्योगमंत्री उदय सामंत यांना राम आळीतून व्यापाऱ्यांनी नेले. मोठ्या संखेने या रॅलीत व्यापारी बांधव आणि बेरोजगार युवक सहभागी झाले होते. मुख्य बाजारपेठेत दुतर्फा असणाऱ्या प्रत्येक दुकानातून उद्योग मंत्र्यांवर पुष्प वृष्टी केली जात होती. शिवाय अनेक व्यापारी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करीत होते. वाजतगाजत हो रॅली गोखले नाका येथे आल्यावर उद्योगमंत्र्यांचा व्यापाऱ्यांच्या विविध स्नघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ, चेंबर ऑफ कॉमर्स, सुवर्णदुर्गकार संघटना, हॉटेल असोसिएशन, नाभिक समाज हितवर्धक मंडळ,अंजना कालबी चौधरी समाज, फळभाजी व्यापारी संघटना, कापड व्यापारी संघटना, मोबाईल व्यापारी संघटना, पथ विक्रेते समिती, सायक्लिस्ट क्लब यांच्या वतीने हे सत्कार करण्यात आले. माझ्या कर्मभूमीत उद्योगधंदे आणल्याने केलेला सत्कार हा माझ्या दृष्टीने खूप मोलाचा आहे असे उद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी काढले.