
अधिसूचना मराठीत निघाली नसल्याने संजय राऊत यांनी रीट्वीट करून आपल्याच सरकारला कानपिचक्या दिल्या
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ट्वीट्स किंवा त्यांची वक्तव्यं नेहमीच चर्चेत असतात. पण आज संजय राऊतांनी केलेलं एक रीट्वीट चर्चेत आलं आहे. मूळ ट्वीटमध्ये राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात काढलेली अधिसूचना मराठीत नसून इंग्रजीत का आहे? असा आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच, राज्य सरकाच्या काराभारात सुटसुटीत मराठी असण्यासंदर्भातला मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, हेच ट्वीट संजय राऊत यांनी रीट्वीट केल्यामुळे त्यांनी आपल्याच सरकारला या रीट्वीटच्या माध्यामातून कानपिचक्या दिल्याचे तर्क राजकीय वर्तुळात काढले जात आहेत.
www.konkantoday.com