
पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये १५ दिवसांसाठी लॉकडाउन वाढवला जाईल -आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात लॉकडाउन वाढवणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये १५ दिवसांसाठी लॉकडाउन वाढवला जाईल अशी माहिती दिली आहे. पुण्यात साखर संकुलमध्ये बैठकीसाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. याआधी गुरुवारी बोलताना राजेश टोपे यांनी लॉकडाइन वाढवणार असून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
“ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट अजूनही जास्त आहे, त्या ठिकाणी आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढणार हे जवळपास निश्चित आहे.
www.konkantoday.com