जलसंपदा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन

रत्नागिरी -जलसंपदा विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आज स्नेहसंमेलनचा जो उपक्रम हाती घेतला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद असा आहे. या वयात विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी मैत्रीची खरी गरज असते हा उद्देश यामुळे नक्कीच पूर्ण होईल. जुन्या आठवणींना यामुळे उजाळा मिळेल. या ठिकाणी आज आम्ही सर्व जमलो असून आम्ही सर्व एक मित्र परिवार आहोत, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता श्री.आर व्ही रेळेकर यांनी आज रत्नागिरी येथे केले.रत्नसिंधू जलसंपदा मित्र परिवार (सेवानिवृत्त) कर्मचाऱ्यांचे पहिले स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक १०जानेवारी रोजी रत्नागिरी येथील बालाजी मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात पार पडले.

याप्रसंगी श्री. आर. व्ही. रेळेकर निवृत्त का. अभि. बोलत होते. यावेळी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंपदा (पाटबंधारे) विभागातील 200 सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर श्री.एम. आर. मेटकरी, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, श्री. आर. व्ही. रेळेकर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, श्री. एन. एस. चव्हाण सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, श्री. सा.दी. रावळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, डी. एन. पद्माळे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, श्री. एम. पी. गरुड सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, श्री. शशिकांत कुबल सेवा निवृत्त ज्येष्ठ बंधू, सौ. लता जोशी सेवानिवृत्त ज्येष्ठ भगिनी, संयोजक श्री. श्रीराम चव्हाण व श्री दिगंबर लांजेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जलसंपदा विभागातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सौ. समीता जोशी व सहकारी यांनी स्वागत गीत व ईशस्तवन गीत सादर केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते देवी लक्ष्मी व भारतरत्न अभियंता सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. श्रीराम चव्हाण यांनी केले. केक कापून सामुदायिक वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी 75 व्या वर्षातील किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या श्री. प्रभाकर शिवराम वाडकर, संगमेश्वर, श्री. बजरंग गोकुळ दाभोळे, चिपळूण, श्री. सुभाष बा. इंदुलकर, चिपळूण, सौ. कल्पना आनंद जोशी, चिपळूण, सौ. लता श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी, श्री. वसंत विश्राम मोहिते, रत्नागिरी, श्री. सु. ज. नाईक, रत्नागिरी, सौ. पद्मजा टेंगशे, रत्नागिरी, श्री. माधव आ. चाळके, रत्नागिरी, श्री. प्रकाश रघुवीर कापडी, रत्नागिरी, श्री. शशिकांत राजाराम कुबल, (मालवण) पुणे, श्रीम. दर्शना वेल्हाळ, रत्नागिरी, श्री. श्रीकांत गणपत मांडवकर, रत्नागिरी, श्री. अशोक सदाशिव बने, रत्नागिरी, श्री. नीलकंठ मोरेश्वर आगाशे, कल्याण, श्री. प्रकाश पांडुरंग हेबाळकर, देवरुख, श्री. अरुण कुलकर्णी, चिपळूण या ज्येष्ठ कर्मचारी बंधू-भगिनींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी श्री. आर. व्ही. रेळेकर, श्री. एन. एस. चव्हाण, श्री. सा.दी. रावळ, डी. एन. पद्माळे, श्री. एम. पी. गरुड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करताना श्रीमती प्राची जोशी यांनी गणेश वंदनेचे सुंदर सादरीकरण केले तर श्री. वासुदेव सडवेलकर यांनी अभंग व निरुपण कीर्तन केले. श्री. उमेश सप्रे यांनी संगमेश्वरी भाषेत एकपात्री कार्यक्रम, श्री. प्रभाकर वाडकर यांनी काव्यवाचन, सौ. स्नेहल दीक्षित यांनी चारोळ्या, सुहास चव्हाण- काव्य वाचन, श्री. विष्णू गुरव – गवळण, श्री. संदीप भोकरे- बोधपर गीत, सौ भारती पावसकर -भावगीत, सौ समिता जोशी हिंदी गीत, सौ. स्मिता लाड -हिंदी गीत, श्री. नामदेव क्षीरसागर यांनी काव्यवाचन केले.

या स्नेहसंमेलनाच्या नियोजन समितीमध्ये श्री. श्रीराम चव्हाण, श्री दिगंबर लांजेकर, सौ. पद्मजा टेंगशे, सौ समिता जोशी, श्री. सुधीर वेल्हाळ, श्री. नरेंद्र बेलवलकर, श्री. संजय मुंगळे, श्री. रामचंद्र डोंगरे, श्री. उमेश सप्रे, श्रीमती प्रतिभा गावडे, श्री. दिलीप रहाटे, श्री. राजेंद्र पाटील, सौ. लता जोशी, उमेश सप्रेव उमेश हेगीस्टे यांनी काम पाहिले तर विभाग प्रतिनिधी म्हणून मंडणगड, दापोली व खेड – श्री. शिरीष मेहता, चिपळूण व गुहागर- श्री. नरेंद्र बेलवलकर व श्री. सतीश विरकर, अलोरे(कोयनाप्रकल्प)- श्री. बजरंग दाभोळे व श्री. भरत माने, रत्नागिरी –श्री दिगंबर लांजेकर, सौ. पद्मजा टेंगशे,

संगमेश्वर (देवरुख) – श्री. रामचंद्र डोंगरे, श्री. उमेश सप्रे, लांजा व राजापूर- श्री संदेश राजाध्यक्ष, कणकवली, देवगड व वैभववाडी- श्री महेंद्रकुमार मुरकर, कुडाळ व मालवण- श्री श्रीराम चव्हाण, श्री. राजन वालावलकर, सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग – श्री. राजू तावडे यांनी सहकार्य केले. यावेळी आंबडपाल -कुडाळ कार्यालयातील कर्मचारी राजू सावंत प्रभावळकर यांनी सर्वांना गुलाबी फेटे बांधले. हे फेटे सर्वांचे आकर्षण ठरले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button