
थकीत वीज बिले भरणार म्हणून ग्रामस्थांनी खासदार व राजकीय पुढार्यांचा केला सत्कार पण ……….
तिवरे धरण ग्रामस्थांची थकीत वीज देयक प्रशासनाकडून भरली जातील असे जाहीर केल्याने तिवरे ग्रामस्थांनी
खासदार व राजकीय पुढार्यांचा सत्कार केला पण अजूनही थकीत बिलाची रक्कम महावितरणकडे जमा नसल्याचे उघड झाले आहे दरम्यान तिवरे ग्रामस्थांची थकीत बिले प्रशासनाने न भरल्यास आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर येथील बाधित कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन कंटेनरमध्ये करण्यात आले होते. येथे वीजपुरवठ्यापोटी ६६ हजारांची रक्कम थकीत होती. ती प्र्रशासनाकडून भरण्याचा निर्णय जिल्ह्याच्या दिशा समितीच्या बैठकीत झाला होता. दरम्यान वीजबिल माफ होणार असल्याने पुनर्वसन कुटुंबानी खासदार तसेच राजकीय पुढार्यांचा सत्कारही केला. मात्र गेल्या दोन महिन्यात थकीत बिलाची रक्कम महावितरणकडे जमा झालेली नाही. त्याबाबतचे कसलेच पत्र महावितरणकडे पाठविण्यात आलेले नाही. पुढार्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली असून बाधीत कुटुंबियांच्या घरात अंधार पडण्याचा धोका कायम आहे. तिवरे धरणग्रस्तांचे थकीत लाईटबिल शासनाने सोमवार दि. २८ जूनपर्यंत भरावे अन्यथा २९ जून रोजी कॉंग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचे चिपळूण नायब तहसिलदार तानाजी शेजाळ यांना गुरूवारी रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, प्रवक्ते अशोकराव जाधव यांनी निवेदन दिले.
www.konkantoday.com