रत्नागिरी शहरानजिकच्या गयाळवाडी येथे भाड्याचे पैसे थकविल्याने मारहाण.
रत्नागिरी शहरानजिकच्या गयाळवाडी येथे भाड्याचे पैसे थकविल्याच्या रागातून तरूणाला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. सुशांत रविंद्र हिरे (३६, रा. गयाळवाडी, रत्नागिरी) असे यात जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.अतुल हनुमंत लाड (रा. कुवारबांव, रत्नागिरी) व सागर किशोर पालकर (रा. पांडवनगर नाचणे रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सुशांत हिरे यांनी भाड्याचे पैसे न दिल्याने त्यांचा संशयित आरोपी यांच्याशी वाद झाला होता.www.konkantoday.com