त्या हेलिकॉप्टर मधून सुनील तटकरे प्रवास करणार होते, सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत चालले होते.

पुण्यातील बावधन बुद्रुक गावाच्या परिसरात बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनाने लगेच पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच अपघात घडलासुनील तटकरे यांनी मंगळवारीच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. सुनील तटकरे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे हे मुंबईला आले होते. आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button