पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांनाच मारहाण.
पती-पत्नीमधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच शिवीगाळ करून मारहाण करणारा जिल्हा परिषदेमधील वाहक चालक दिलीप शंकर राठोड (३७, रा. कोकणनगर) याच्या विरोधात कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र खापरे यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार २९ सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्थानकात प्राजक्ता दिलीप राठोड यांनी फोन करून आपल्याला सर्वांसमक्ष पती दिलीप राठोड मारहाण करीत असल्याची माहिती दिली. आपल्याला तात्काळ मदत द्या अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली. त्यानंतर पोलीस हवालदार महेंद्र खापरे व चालक साळवी यांच्यासह कोकणनगर येथे दाखल झघले.त्यावेळी दिलीप राठोड हा पत्नी प्राजक्ता यांना मारहाण करून शिवीगाळ करत होता. प्राजक्ता हिला मारहाण करणार्या दिलीप राठोड याला दोघा पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी तू कोण पोलीस, असे विचारत दिलीप राठोड याने शिवीगाळ करत दोघांच्या अंगावर गेला. मी जिल्हा परिषदेच्या साहेबांच्या गाडीवर आहे, माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, मी पोलिसांना मानत नाही असे सांगत पोलिसांनाच मारहाण केली.www.konkantoday.com