गुरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा नदीपात्रात बुडून मृत्यू.
लांजा तालुक्यातील गोळवशी तेलीवाडीतील सुमती दत्ताराम तेली (६५) यांचा रानात गुरे चारण्यासाठी गेले असता माळरानावर पडून आकस्मिक मृत्यू झाला.सुमती तेली या ओमळी या ठिकाणी रानात गुरे चरवण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी १ वाजेपर्यंत त्या घरी न आल्याने घरातील नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. ओमळीपासून जवळच असलेल्या धावजी मंदिर पुलाजवळील नदीपात्रात सुमती तेली मृतावस्थेत आढळून आल्या. मुलगा तानाजी दत्ताराम तेली याने लांजा पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून तक्रार दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल तेजस मोरे पुढील तपास करीत आहेत. www.konkantoday.com