विपुल कदम यांना सीट दिली तर, त्याचा पराभव नक्की रामदास कदम यांचा थेट इशारा.

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणाही पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या उमेदवारीला आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी विरोध केला आहे. एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघ हा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदु झाला आहे. कारण, गुहागरमधून खासेदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांनी उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारीभेटायला गेले होते. यावेळी गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. मात्र, या उमेदवारीला रामदास कदम यांनी स्पष्ट शब्दात विरोध केला आहे.जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटतं नाही. अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल, अशा शब्दात रामदास कदम यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात विरोध केला आहे. नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट दिली तर, त्याचा पराभव नक्की असल्याचंही कदम यांनी स्पष्टच सांगितलं. तसेच, विपुल उमेदवार असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा, पण मी गुहागर विधानसभा मतदार संघात पाय ठेवणार नाही, असेही रामदास कदम यांनी परखडपणे बोलून दाखवले. दरम्यान, शिंदे गटाकडून पितृपक्ष संपल्यानंतर विपुल कदम यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही बातमी बाहेर येताच विपुल कदम हे कामाला लागल्याचे दिसत आहे. कारण, विपुल कदम यांच्याकडून गुहागरमध्ये ‘धर्मवीर-2’ या चित्रपटाचे मोफत खेळ आयोजित करण्यात आले आहेत. विपुल कदम यांच्याकडून शहरात याचे फलक लावून जोरदार जाहिरातबाजी केली जात आहे. यानिमित्ताने विपुल कदम हे गुहागरमध्ये पूर्णपणे सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button