कोकण रेल्वेला ‘बेस्ट ईएसजी प्रॅक्टिसेस’साठी महात्मा पुरस्कार प्रदान.
आज दिल्ली येथे दिग्गजांच्या उपस्थितीत आयोजित एका कार्यक्रमात कोकण रेल्वेला ‘बेस्ट ईएसजी प्रॅक्टिसेस’साठी महात्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला. किरण बेदी यांच्या उपस्थितीत कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.पर्यावरण शाश्वतता, सामाजिक जबाबदारी आणि पारदर्शक प्रशासन यावर कोकण रेल्वे विशेष लक्ष देते याची दखल घेण्यात आली आहे