
जिल्ह्यातील शेती बागायतीसाठी उपद्रवी ठरत असलेल्या वानरांसाठी आक्टोबरमध्ये पकड मोहीम, वनखात्याची योजना.
जिल्ह्यातील शेती बागायतीसाठी उपद्रवी ठरत असलेल्या वानर, माकडांना पकडून अभयारण्यात सोडण्याकरिता येत्या १५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा माकड, वानर पकडण्याची मोहीम वनविभागाकडून हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी वनविभागाकडून ३५ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. यावर्षी ऐन उन्हाळ्यात राबवण्यात आलेली मोहीम फारशी प्रभावी ठरली नव्हती. त्यामुळे आता सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात फलधारणा होण्याअगोदरच्या हंगामात माकड पकड मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्ह्यात माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंबा व काजूबरोबर इतर फळांचे उत्पन्न घेतले जाते. याबरोबर भाजीपाला व भातशेती कोकणात केली जाते. मात्र गेली काही वर्षे फळबागा व शेतीपिकांचे माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.www.konkantoday.com