
येत्या दोन-तीन दिवसांत टाळेबंदीचा निर्णय घेतला जाणार
करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात टाळेबंदी लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असले तरी ती तातडीने लागू के ली जाणार नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दोन आठवड्यांच्या कडक टाळेबंदीची शिफारस तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाने केल्याने टाळेबंदीबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असून, येत्या दोन-तीन दिवसांत टाळेबंदीचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत
www.konkantoday.com