उद्धव ठाकरे आनंद दिघे यांचं खच्चीकरण करत होते-रामदास कदम.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे.उद्धव ठाकरे आनंद दिघे यांचं खच्चीकरण करत होते. ठाकरेंनी आनंद दिघेंना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता. दिघेंनी हॉस्पिटलमध्ये असताना ही गोष्ट सांगितली होती, असा मोठा दावा रामदास कदम यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.उद्धव ठाकरेंनी मोठे होणार्‍यांचे पंख कापले. यात माझ्यासह दिघेंचा देखील समावेश होता. दिघेंचे उद्धव ठाकरे खच्चीकरण करत होते हे १०० टक्के खरं आहे. माझ्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये अशी भीती त्यांना असावी. त्यांनी अनेक नेत्यांचे पंख कापले आहेत. त्यामुळे दिघे यांचे पंख कापण्याचे काम त्यांनी केले की काय? याबाबत माझ्या मनात संशय आहे, असं रामदास कदम म्हणाले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button