
गणपतीपुळे येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन जणांचा मृत्यू.
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचविण्यात गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व स्थानिक व्यवसायिकांना यश आले.रविवारी सायंकाळी फिरण्यासाठी आलेल्या जयगडच्या कंपनीतील तीन जणांनी खोल समुद्रात जाण्याचा प्रयत्न केला असता तिघेही पाण्यात बुडू लागले. तिन्ही तरुणांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न स्थानिक जीव रक्षक आणि समुद्र चौपाटीवरील व्यवसायिकांनी केला मात्र त्यामध्ये मोहम्मद आसिफ (वय 35, राहणार वेस्ट बंगाल सध्या राहणार जयगड) व प्रदीप कुमार (वय 35, राहणार उडीसा सध्या जयगड) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर ठुकु डाकवा (वय 30 राहणार उत्तराखंड सध्या जयगड) याला वाचविण्यात जीव रक्षक व स्थानिक व्यवसायिकाना यश आले.