
त्यांना उद्या पंतप्रधान बनवलं तरीसुद्धा कोकणातून शिवसेनेला हटवणे हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. केंद्र सरकारच्या लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार ते पाहणार आहेत. नारायण राणे यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं की, सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवलं तरी तरी सुद्धा कोकणातून शिवसेनेला हटवणे हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही. कोकण आणि शिवसेना हे अभेद्य नातं तोडण्याचं काम कोणीही करू शकत नाही, असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.विनायक राऊत यावेळी म्हणाले. तसेच मुंबई आणि शिवसेना यांचं जे नातं आहे हे अभेद्य नातं मागच्या ३० वर्षांपासून आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल, तो उतरवण्याची ताकद कोणामध्ये नसल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं.
www.konkantoday.com
