
चिपळुणात नेत्यांचे दौरे संपले, आणि रस्त्यावरील खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले.
राष्ट्रवादीच्या जन सन्मान यात्रेनिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीर सभेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या येथील दौर्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून चिपळूण शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डेे घाईगडबडीत बुजविण्यात आले. मुळातच योग्य पद्धतीने भरले न गेलेले खड्डे किती दिवस टिकतील अशी शंका खड्डे भरतानाच उपस्थित होत असताना त्याची प्रचिती गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसात आली. त्यामुळे नेत्यांचे दौरे संपले, नेतेही निघून गेले आणि खडीने भरलेल्या खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे.www.konkantoday.com



