राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी.
राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यापासून महायुतीमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर शिंदेसेना तसेच भाजपचे नेते वारंवार टीका करत आहेत.त्यामुळे अजित पवार गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच अजित पवार महायुतीमधून बाहेर पडतील, अशाही बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आता राष्ट्रवादीच्या नाराजीनाट्यात नवा ट्वीस्ट आला असून अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 2024-25 या वर्षासाठी 24 विभागीय संसदीय स्थायी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनाही संधी देण्यात आली आहे.