केंद्र सरकार एअर इंडियाचे खासगीकरण करणार

केंद्र सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने एअर इंडियातील 100 टक्के समभाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 मध्ये केंद्र सरकारने स्वतःकडील जास्तीत-जास्त समभाग विकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्याला गुंतवणूकदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु, आता सरकारने आपल्या ताब्यातील सर्व हिस्सा विकण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी सरकारकडून सोमवारी निविदा जाहीर करण्यात आली आहे. निविदा भरण्यासाठी 17 मार्च 2020 अखेरीची तारीख असणार आहे.
एअर इंडियामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एअर इंडियाचे 3.26 अब्ज डॉलरचे कर्ज आणि इतर जबाबदाऱ्या घ्याव्या लागणार आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button