रत्नागिरी शहरात राधाकृष्ण टॉकिज येथील एका घरी भर दिवसा घुसून एका जोडप्याने वृध्देच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला.
रत्नागिरी शहरात राधाकृष्ण टॉकिज येथील एका घरी भर दिवसा घुसून एका जोडप्याने वृध्देच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केल्याने खळबळ उडाली आहे.घरी भाड्याने रुम घेण्याचा बहाण करत एका जोडप्याने शुक्रवारी सकाळी 9 वा. सुमारास सुनंदा पटवर्धन (72,रा. रत्नागिरी ) या वृद्ध महिलेच्या घरात घूसून दोन्ही दरवाजे बंद करत तोंड दाबून अंगावरील साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असताना काही दिवसांपूर्वीच या महिलेकडे काहीजण भाड्याने रुम मिळेल का अशी चौकशी करुन गेल्याचे समजते. चौकशी करणार्यांनीच महिला घरात एकटीच रहात असल्याची तसेच तिच्या अंगावर सोन्याचे दागिने असल्याची रेकी केली. त्यानंतर या जोडप्याने शुक्रवारी महिलेच्या घरी घुसून पुढील आणि मागील बाजुचा दरवाजा बंद केला. त्यानंतर वृध्द महिलेचे तोंड दाबून तिच्याकडील सर्व सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. परंतू तिच्या हातातील एक बांगडी न निघाल्यामुळे त्यांनी हाती येतील तेवढे दागिने घेउन धुम ठोकली. याप्रकरणी शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शहर पोलिस आजुबाजुच्या सीसीटिव्हीचे फूटेज तपासत असून सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत शहर पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती