
लांजा तालुक्यात रानकुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर.
लांजा तालुक्यात काही गावांमध्ये कोळसुद्यांचे (रानकुत्रे) अस्तित्व दिसू लागल्याने रानडुक्करांपासून भातशेतीचे होणारे नुकसानीचे प्रमाण कमी झाले आहे.तळवडे, येरवंडे, आसगे आदी गावात रानकुत्रे दिसत आहेत. यामुळे शेतीचे नुकसान करणारे माकड, रानडुक्करांचे प्रमाण कमी असल्याचे येथील शेतकर्यांनी सांगितले. लांजा वनपाल फकीर यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोळसुंदे म्हणजेच रानकुत्रा, कोळशिंदे, कोळसुंदे, कोळीसनं, कोळसून, सोनकुत्रा अशा बर्याचशा स्थानिक नावांनी ओळखला जाणारा, कळपाने राहणारा हा मांसभक्षी जंगली कुत्रा सह्याद्रीच्या घनदाट अरण्यामध्ये याचा वावर असतो. रानकुत्र्यांच्या अस्तित्वाबाबत वनविभाग सतर्क झाला आहे. www.konkantoday.com