
रत्नागिरी उप परिसराच्या मार्फत स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन लवकरच सुरु होणार
रत्नागिरी – मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी केंद्रामार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. दरम्यान विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम पाहता त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचा विचार मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी केंद्राच्यावतीने सुरू आहे. किंबहुना ते प्रस्तावित आहे. त्यासाठी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, इतिहास, अंकगणित/ बुद्धिमत्ता चाचणी, भूगोल राज्यशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र या विषयांचा समावेश आहे. लक्षणीय बाब म्हणजे हे मार्गदर्शन विनामूल्य असणार आहे. दरम्यान या मार्गदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील केंद्रामार्फत करण्यात येत आहे. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गुगल फॉर्म वरती नोंदणी करावी. तसेंच उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास 9420270911 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील केंद्रामार्फत करण्यात आलेले आहे. शिवाय, सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या कार्यालयीन वेळात प्रत्यक्ष रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठ, पी -61, एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी या ठिकाणी इच्छुक उमेदवार प्रत्यक्ष भेट देऊन संपर्क करू शकतात.
सोबत फॉर्मची लिंक आहे