
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सर्वत्र उत्साहात मतदान, युवा सेना व अभाविपची लढत.
मुंबई विद्यापीठाच्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांकरिता मंगळवारी मतदान पार पडले. १० जागांवरील निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार असून युवासेना विरूद्ध अभाविप अशी जोरदार चुरस या निवडणुकीसाठी पहायला मिळणार आहे. निवडणुकीचा निकाल दि. २७ सप्टेंबरला जाहीर होणार असून त्यात कुणाचे वर्चस्व राहणार याकडे लक्ष लागले आहे.मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रांवर ५४ बुथवर ही निवडणूक घेण्यात आली आहे. निवडणुकांसाठी एकूण १३.४०६ मतदार आहेत. मंगळवारी सकाळी ९ ते ५ मतदानाची वेळ होती. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेत स्थळावर केंद्रनिहाय, बुथनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.www.konkantoday.com