
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारे दोन्ही अधिकारी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. ज्या पोलीस व्हॅनमधून त्याला तळोजा येथून बदलापूर येथे तपासणीकामी नेण्यात येत होते, त्याच दरम्यान अक्षय शिंदे याने गोंधळ घालून पोलीस अधिकार्यांचे रिव्हाल्वर काढून त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून सिनियर पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या बंदुकीतून झाडलेल्या गोळीमुळे अक्षय शिंदे यमसदनी गेला आणि बदलापूर प्रकरणाचा बदला पूर्ण झाला. मात्र या उन्काऊंटरमध्ये निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते गंभीर जखमीदेखील झाले.या प्रकरणामध्ये ज्यांच्या पायाला गोळी लागली ते निलेश मोरे आणि ज्यांच्या गोळीमुळे आरोपी अक्षय शिंदे मेला ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे दोघेही खेड तालुक्यातील आहेत. बदलापूर प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरमुळे बदलापूर शहर, ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रात बदला पूर्ण अशी प्रतिक्रिया उमटली. www.konkantoday.com