
रागातून कामगाराच्या डोक्यात फावडे मारुन ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुकादमाला न्यायालयाने मंगळवारी 5 वर्ष कारावास आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली
क्रशरवर जेवणाची सूट्टी झाल्यानंतर पाच मिनिटे उशिरा आल्याच्या रागातून कामगाराच्या डोक्यात फावडे मारुन ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या मुकादमाला न्यायालयाने मंगळवारी 5 वर्ष कारावास आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.ही घटना 30 एप्रिल 2020 रोजी दुपारी 2.30 वा. सुमारास लांजा तालुक्यातील मौजे कोर्ले खिंड येथे घडली होती.विलास काशिनाथ राठोड (34,रा.तिवारी जि.विजापूर,कर्नाटक) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात नवनाथ दुलाप्पा पवार (38,रा.लातूर) यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानूसार, नवनाथ पवार हे शरद दत्ताराम लाखण (रा. भांबेड) यांच्या कोर्ले खिंड येथील क्रशरवर ट्रॅक्टरमध्ये उत्खनन केलेले दगड भरण्याचे काम करायचे. तर आरोपी विलास राठोड हा तेथील कामगारांवर देखरेख ठेवण्यासाठी मुकादम म्हणून कामाला होता. 30 एप्रिल 2020 रोजी दुपारी 2.30 वा. जेवणाची सूट्टी झाल्यानंतर पाच मिनिटे उशिरा कामाला आल्याच्या रागातून आरोपी विलास राठोडने नवनाथ पवारला शिवीगाळ करत तुला ठार मारुन टाकतो असे बोलला. त्यानंतर बाजुला असलेले फावडे त्याच्या डोक्यात उजव्या बाजुस मारुन गंभिर दुखापत करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. व लाथांनीही मारहाण केली होती.