मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यप्राण्यांची तस्करीचे प्रकरण उघडकीस.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यप्राण्यांची तस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने ही कारवाई केली.मोहम्मद रेहान मदनी अजमेरी आणि हमजा युसूफ मन्सुरी अशी आरोपींची नावे आहेत. दोघा आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी अधिकाऱ्यांनी अर्जाद्वारे केली आहे.मोहम्मद अजमेरी हा 27 सप्टेंबर रोजी विस्तारा फ्लाईटने बँकॉकहून मुंबईत आला. विमानतळावर तपासणी दरम्यान त्याची झडती घेतली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मात्र त्याच्या सामानाची तपासणी घेत असताना अधिकाऱ्यांना त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये सर्जिकल मास्क बॉक्समध्ये दोन जिवंत मगरीची पिल्लं आढळून आली.अधिकाऱ्यांकडून अजमेरीची चौकशी सुरू असतानाच त्याला एक कॉल आला. यामुळे तपास अधिकाऱ्यांचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी कॉल करणारा अजमेरीचा सहप्रवाशी हमजा मन्सुरीला विमानतळाबाहेरून ताब्यात घेतले. मन्सुरीच्या सामानाची झडती घेतली असता त्यात आणखी तीन पिल्लं सर्जिकल बॉक्समध्ये आढळून आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button