
मुंबईसह उपनगरात आज देखील मुसळधार पावसाचा इशारा,रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी.
मुंबईसह उपनगरात आज देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.सोबतच, ठाण्यात देखील वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.रायगडला रेड अलर्टरायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.