
किरण सामंत यांच्या पाठपुरानंतर राजापूर शहराला अग्निशमन केंद्राला मिळाली मंजुरी. लवकरच राजापूरला अग्निशमन वाहन दाखल
राज्याच्या सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या माध्यमातून अग्निशमन व आपतकालीन सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियान योजने अंतर्गत राजापूर नगरपरिषदला अग्निशमनकेंद्राला आणि वाहनाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजिदादा पवार आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून हा विषय मार्गी लागला आहे. या कामासाठी किरण सामंत यांनी पाठपुरावा केला आणि त्यांना यश आले. राजापूरवासियांची आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी होणाऱ्या त्रासाला किरण सामंत यांच्या माध्यमातून पूर्णविराम मिळाला आहे. शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता खूप मोठी असून या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थेच्या माध्यमातून सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी इतर ठिकाणी असलेल्या साधनसामग्रीवरती अवलंबून राहावे लागायचे. ही बाब पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधूरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अग्निशामन केंद्राच्या पाठपुरावाला सुरुवात केली आणि अखेर आज तो दिवस उजाडून राजापूरच्या अग्निशामक केंद्र आणि वाहनाला त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयी सुविधांना आज शासनाने मंजुरी दिली आहे.महाराष्ट्र मधील ‘ड’ महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका यांच्या अग्निशमन सेवेतील तूट भरून काढण्याकरता आणि राज्यातील अग्निशमन सेवेतील सक्षमीकरण करण्याकरता विविध आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राजापूरच्या अग्निशामन केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे.