कोकण मार्गावरून धावणार्‍या राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल लंपास.

कोकण मार्गावरून धावणार्‍या रेल्वेगाड्यांतून प्रवास करणार्‍या प्रवाशांचे मोबाईल लंपास करण्याचे प्रकारही वाढत चालले आहेत. राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या एका प्रवाशाचा ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केल्याची घटना आंजणी रेल्वेस्थानकानजिक घडली. चोरट्यावर शनिवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.संतोषकुमार के. जी. (४८, रा. एर्नाकुलम) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ते १२४३२ क्र.च्या निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमधील ए-०१ डब्यातील ११ क्रमांकाच्या आसनावरून निजामुद्दीन येथून तिरूवअनंतपुरम येथे जाण्यासाठी प्रवास करत होते. त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. तर दुसरा मोबाईल बार्डावर ठेवला होता ते झोपी गेल्याची संधी साधत चोरट्याने ३० हजार रुपये किंमतीचे मोबाईल लंपास केले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button