भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे खळबळ

ठाकरे गटाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार चिपळूण दौऱ्यावर आलेले असताना विक्रांत जाधव यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी गप्पा मारल्या.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांची गुहागर मतदारसंघातून विधानसभा लढण्याची इच्छा आहे. गत पंचवार्षिक विधानसभेवेळी प्रयत्न करूनही त्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती. यंदाच्या साली काहीही करून विधानसभा लढायची, असाच त्यांना प्रण आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहे.दुसरीकडे आमची भेट केवळ कौटुंबिक असून त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शहरात आल्यामुळे त्यांचे स्वागत करणे ही आमची संस्कृती असल्याचे आवर्जून विक्रांत जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button