
थिबा राजा कालीन बुद्धविहाराचे आज भूमिपूजन
रत्नागिरी :- शहरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामागील जागेत उभारण्यात येणाऱ्या थिबा राजा कालीन बुद्धविहाराचे सोमवारी भूमिपूजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज 23 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मागील जागेत होणार आहे.या कार्यक्रमासाठी उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत. त्याचपमाणे यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा देखील होणार आहे.