
एसटी महामंडळाच्या खेड-चिपळूण मार्गावर एसटी बिघाडाचे विघ्न
एसटी महामंडळाच्या खेड येथील बसस्थानकातून लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात व खेड-चिपळूण बसेसमध्ये भर रस्त्यातच तांत्रिक बिघाड होण्याचे सत्र सुरूच आहे. स्थानकातून सुटणार्या एसटी बसेस भर रस्त्यातच अचानक बंद पडत असल्याने तिष्ठत बसणार्या प्रवाशांना अन्य बसफेर्यांमधून रेटारेटीचा प्रवास करावा लागत आहे. बुधवारी येथील बसस्थानकातून मार्गस्थ झालेली खेड-चिपळूण बस आवाशीनजिक अचानक बंद पडली. प्रवाशांची खचाखच अन्य बसमध्ये व्यवस्था करण्यात आली.
येथील बसस्थानकातून मार्गस्थ होणार्या एसटी बसेसमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र अद्यापही कायम असल्याने प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत.
www.konkantoday.com