इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स ॲण्ड ज्वेलरी कँम्पस प्रशिक्षण केंद्राचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन. रत्नागिरी, दि. २३ (जिमाका) : जेम्स ॲण्ड ज्वेलरी कौन्सील व उद्योग विभाग यांनी स्थापित केलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॕम्पस प्रशिक्षण केंद्राचे उद्या मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
स्वयंवर मंगल कार्यालयात दुपारी 4 वाजता हा उद्घाटन सोहळा होणार आहे. यामध्ये जेम्स ॲण्ड ज्वेलरी प्रशिक्षण केंद्राचे कार्य, प्रशिक्षण सुरु व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील रोजगार संबंधित उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी, या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी, इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर यांनी केले आहे.*भारतीय जेम्स आणि ज्वेलरी संस्था*संगणकाच्या सहाय्याने दागिने बनविणे (रायनोसोरस), कार्यक्रमाचा कालावधी – 20/40 दिवस – किमान शैक्षणिक पात्रता -12 वी पास, आयटीआय, शिक्षण्यासाठी कोणतीही वय मर्यादा नाही.नोकरीच्या उपलब्ध संधी – भारत डायमंड, पंचरत्न कोल्हापूर दागिने बनविणारे क्षेत्र.मेटल सेटींग – कार्यक्रमाचा कालावधी – 20/40 दिवस – किमान शैक्षणिक पात्रता- 8वी, 10 वी, 12वी पास, आयटीआय, डिप्लोमा, शिकण्यासाठी कोणतीही वय मर्यादा नाही.नोकरीच्या उपलब्ध संधी- मुंबई (SEEPZ, भारत डायमंड्स, पंचरत्न, कोल्हापूर दागिने बनविणारे क्षेत्र) मेटल सेटरकास्टिंग मशीन ऑपरेशन – कार्यक्रमाचा कालावधी – 20/40 दिवस, किमान शैक्षणिक पात्रता- 8वी, 10 वी, 12 वी पास, आयटीआय, डिप्लोमा, शिकण्यासाठी कोणतीही वय मर्यादा नाही.नोकरीच्या उपलब्ध संधी- मुंबई (SEEPZ, भारत डायमंड्स, पंचरत्न, कोल्हापूर दागिने बनविणारे क्षेत्र) कास्टिंग मशीन ऑपरेटरपॉलिशिंग आणि फिनिशिंग – कार्यक्रमाचा कालावधी -20/40 दिवस, किमान शैक्षणिक पात्रता – 8वी, 10 वी, 12वी पास, आयटीआय, डिप्लोमा, शिकण्यासाठी कोणतीही वय मर्यादा नाही.नोकरीच्या उपलब्ध संधी- मुंबई (SEEPZ, भारत डायमंड्स, पंचरत्न, कोल्हापूर दागिने बनविणारे क्षेत्र) दागिने पॉलिशरफायलींग आणि पाॕलिशिंग – कार्यक्रमाचा कालावधी – 20/40 दिवस, किमान शैक्षणिक पात्रता – 8वी, 10 वी, 12वी पास, आयटीआय, डिप्लोमा अधिक माहितीसाठी संपर्क करा, शिकण्यासाठी कोणतीही वय मर्यादा नाही.नोकरीच्या उपलब्ध संधी- मुंबई (SEEPZ, भारत डायमंड्स, पंचरत्न, कोल्हापूर दागिने बनविणारे क्षेत्र) फायलींग व असेंबली करणारे.