लालबागच्या राजाच्या लिलावात तब्बल २ कोटी ३५ लाख १८ हजार रुपयांच्या दागिन्यांची बोली.
मुंबईतील लालबागचा राजाची नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख आहे. या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह संपूर्ण राज्यातून आणि देशभरातून भाविक लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच मोठ्या प्रमाणात भाविक गणपती पुढे दान देत असतात. या वर्षी देखील भाविकांनी गणेशोत्सवात विविध वस्तूंचे, सोन्या चांदीच्या दगिन्यांचे दान केले. या वर्षी ५.६५ कोटी रुपये रोख, ४.१५ किलो सोनं आणि ६४.३२ किलो चांदी लालबागचा राजा गणपतीला अर्पण करण्यात आले.मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणेशोत्सवात दान मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा लिलाव करण्यात आला.या लिलावात तब्बल २ कोटी ३५ लाख १८ हजार रुपयांच्या दागिन्यांची बोली भाविकांनी लावली. या रकमेचा उपयोग हा मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे.मुंबईतील लालबागचा राजाची नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख आहे. या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह संपूर्ण राज्यातून आणि देशभरातून भाविक लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच मोठ्या प्रमाणात भाविक गणपती पुढे दान देत असतात. या वर्षी देखील भाविकांनी गणेशोत्सवात विविध वस्तूंचे, सोन्या चांदीच्या दगिन्यांचे दान केले. या वर्षी ५.६५ कोटी रुपये रोख, ४.१५ किलो सोनं आणि ६४.३२ किलो चांदी लालबागचा राजा गणपतीला अर्पण करण्यात आले.