मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताची मालिका सुरूच, तीन वाहनांची धडक एक ठार, दोन जखमी.

मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताची मालिका काही थांबेना. शुक्रवारी पहाटे एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन वाहनांची एकमेकांना धडक लागली.अपघातात एका व्यक्तीने जीव गमावला. तर दोन जण जखमी झाले आहे. हा अपघात भाताण बोगद्याजवळ ट्रक, ट्रॅंकर आणि कार या तीन वाहनांमध्ये घडलामिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास भाताण बोगद्याजवळ टॅक, ट्रॅंकर आणि कारची धडक लागल्याने अपघात झाला.या अपघातात एकाचा मृत्यू झाला. देवेंद्र सिंग राजपूत असं मृत तरुणाचे नाव आहे. अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी दोन जखमी तरुणांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सुरज कुदळे आणि अक्षय पाटील असं जखमी झालेल्या तरुणांची नावे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button