
चिपळूणात पोलीस असल्याचे भासवून वृद्धाचे दोन लाखाचे दागिने भामट्याने लांबविले.
झटपट पैसे मिळवण्याच्या नादात गुन्हेगार नवे नवे मार्ग अवलंबितातपोलिस असल्याचा बनाव करून चिपळुणात दोन एका वृद्धाचे दोन लाखांचे दागिने लंपास केले आहेत. यामध्ये चार तोळे वजनाचे ब्रेसलेट, चेन, अंगठी असा ऐवज लंपास केला आहे.याप्रकरणी विजय शांताराम सावंत (६८, रा. मार्कंडी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना १७ सप्टेंबर रोजी ६.१५ वा. मार्कंडी येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सावंत हे आपली दुचाकी घेऊन घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलने आल्या व आम्ही पोलिस आहोत असे सांगून तुमच्या गाडीची कागदपत्रे आणि लायसन्स त्यांना विचारले. याचवेळी या भामट्या पोलिसांनी, तुम्ही दागिने अंगावर घालून का फिरता? चिपळुणात चोऱ्या वाढल्या आहेत, असे सांगून सावंत यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन तेथून धूम ठोकली.