महायुतीच्या जागा वाटपात आता रिपाइंला 12 ते 13 जागा हव्यात- रामदास आठवले यांची मागणी.
महायुतीचं जागा वाटप युद्धपातळीवर सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. जागा वाटप झाल्यानंतर मीडियाला त्याची माहिती दिली जाणार असल्याचं महायुतीचे नेते सांगत आहे. मात्र, सध्या तरी महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्येच जागा वाटप सुरू आहे.मित्र पक्षांचा या जागा वाटपात समावेश करण्यात आलेला नाही. मित्र पक्षांना आपआपल्या कोट्यातून मुख्य पक्ष जागा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीच्या जागा वाटपात आता रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. रामदास आठवले यांनी रिपाइंला काही जागा सोडण्याची आणि मंत्रिपदे देण्याची मागणी केली आहे. आठवले यांची ही मागणी मान्य केली जाते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.रामदास आठवले आज रत्नागिरीत होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. रामदास आठवले यांनी यावेळी महायुतीकडे जागा मागितल्या आहेत.आम्हाला सोबत घेऊन 2012च्या निवडणुकीपासून महायुतीचा प्रयोग झाला आहे. आता आमच्या पक्षालाही जागा दिल्या पाहिजेत. आम्हाला किमान 10 ते 12 जागा मिळायला पाहिजे. दोन मंत्रिपदे आणि महामंडळे पाहिजे. माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. महाराष्ट्रात महायुतीचे जे खासदार निवडून आले आहेत. त्यात आमचाही खूप मोठा वाटा आहे, असं रामदास आठवले म्हणाले.