
स्वायत्त कोकणासाठी आंदोलन-समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष संजय यादवराव.
स्वायत्त कोकणासाठी गुरुवारपासून आंदोलन छेडले जाणार आहे. हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार असल्याची माहिती समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिली. ते शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.यावेळी ते पुढे म्हणाले की, कोकणातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ९ वा. हातखंबा येथून अंबर हॉलपर्यंत रॅली काढण्यात येणार असून, त्यानंतर अंबर हॉल येथे स्वायत्त कोकण परिषद पार पडणार आहे. यामध्ये पर्यटन, आंबा बागायतदार, शेती, मच्छीमार, युवक कोकणावर होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा व स्वायत्त कोकण याविषयी जाहीरनामा जाहीर करण्यात येणार आहे.