कोकण रेल्वेत पदभरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरूवात.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदभरतीच्या अर्ज प्रक्रियेला १६ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. १९० पदांचा समावेश असून ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. कोकण रेल्वेत वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ञ, सहाय्यक लोकोपायलट, स्थानकप्रमुख, मालवाहतूक व्यवस्थापक, कमर्शियल परिवेक्षक, ट्रॅक व्यवस्थापक व पॉईंट मॅन या पदाचा समावेश आहे. या पदासाठी केवळ गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील मूळ रहिवाशीच अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांची रेल्वेसाठी जमीन संपादित झाली आहे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोकण रेल्वेत कर्मचारी आहेत. ते देखील अर्ज करू शकतात. या पदासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांना ६ ऑक्टोबरपर्यंत रात्री ११.५९ पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता वेळेअभावी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या पदांवरील निवडीसाठी उमेदवाराला प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर रिक्त पदांनुसार चाचणी घेवून कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. काही पदांसाठी शारिरीक कार्यक्षमता चाचीही द्यावी लागणार आहे. पहिला टप्पा पार केल्यानंतरच उमेदवार पुढच्या टप्प्यात जातील. व सर्व टप्पे पार केल्यानंतरच अंतिम निवड केली जाणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button